सुखाची गुरुकिल्ली
१. रोज किमान सात तास झोपा२. जगण्यासाठी आवश्यक तीन गोष्टी ---स्फूर्ती , उत्साह ,दिलदारी
३. रोज सुहास्य वदनाने अर्धा तास मोकळ्या हवेत फिरा .
४. रोज किमान पंधरा मिनिटे एका जागी शांत ,स्तब्ध राहा .
५. चांगली पुस्तके वाचा . मनन करा . त्यातून जीवनाला ऊर्जा मिळेल .
६. रोज मुबलक सात -आठ ग्लास पाणी प्या .पाणी म्हणजे जीवन !
७. जागेपणी स्वप्ने पहा . त्यांचा ध्यास घ्या . स्वप्नांच्या पूर्तीसाठी झटून प्रयत्न करा .
८. हसून , खेळून, मिळून- मिसळून आनंदी राहा . मन करारे प्रसन्ना ,सर्व सिद्धींचे कारण !
९. रोज ध्यान धारणा करा . प्रार्थना करा . सुख शांति समाधानाचा अनुभव घ्या .
१०. सकाळचा नास्ता भरपूर घ्या , दुपारचे जेवण मध्यम घ्या , रात्रीचे जेवण कमी घ्या .
११. खाण्यामध्ये फळे , फळभाज्या , पालेभाज्या यांचा मुबलक वापर करा .
१२. रोज थोडेतरी खेळा . मनाला ,शरीराला विरंगुळा मिळेल .
१३. स्वतः हसा आणी दुसऱ्यांना हसवा . हसण्याने मन प्रसन्न होते .
१४. दुसऱ्यांची निंदा , कुचेष्टा करू नका . त्याऐवजी चांगल्या गोष्टीत वेळ सत्कारणी लावा .
१५. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ,ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुखः करू नका .
१६. आपले वर्तमान कसे सुधारता येईल ते पहा . वर्तमानातले चांगले कार्य भविष्य घडविते .
१७. स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका . इतरांना तुमची काही पडलेली नाही .
१८. हे जीवन फार छोटे आहे . दुसऱ्याचा हेवा , मत्सर , द्वेष करण्यात ते वाया घालवू नका .
१९. भूतकाळातील अप्रिय घटना पुन्हा पुन्हा आठवून वर्तमान बिघडवू नका . त्या विसरून जा .
२०. जीवन ही पाठशाळा आहे . त्यातून धडे घेवून शहाणे व्हा .
२१. दुसऱ्याशी आपली तुलना करू नका . त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होवू नका .
२२. दुखाःचे , तणावाचे दिवस संपतील . परिस्थिती कायम बदलत राहते . धीर धरा .
२३. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ अजून यावयाचा आहे . हे मनी धरा आणि प्रसन्न रहा .
२४. तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधार स्तंभ आहे . त्यांना प्राधान्य द्या .
२५. कोणताही प्रसंग येवो ,धैर्य सोडू नका . धैर्याने जगास सामोरे जा .
२६. जीवन हा हार -जीतीचा खेळ आहे . जिंकण्याबरोबर हरणेही स्वीकारा .
२७. वृध्द माणसे आणि छोटी मुले यांच्या समवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा .
२८. वृद्धांना जगण्याची उमेद द्या आणि छोट्यांकडून उर्जा घ्या .
२९. कोणत्याही परिस्थितीत सुखी आणि आनंदी रहायला शिका .
३०. हे सुंदर विचार लोकांना कळवा .
No comments:
Post a Comment